यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी
सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आढळून आले..
विटा -
आज दिनांक २९-०१-२०२१ रोजी एस.जी.झेड.अँड एस. जी.ए. शुगर्स(लि.) च्या युनिट क्रमांक २ यशवंत शुगर नागेवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या निरीक्षक वैधमापन शास्त्राच्या भरारी पथकाने कारखान्याच्या सर्व ऊस वजन काट्यांची तपासणी केली असता सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल भरारी पथकाने सादर केला आहे .सदर भरारी पथकामध्ये श्री एस व्ही कोल्हापुरे द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग -१, तहसीलदार यांचे प्रतिनिधी श्री एस एस साळुंखे प्रभारी निवासी नायब तहसीलदार विटा,श्री बी. बी.खरमाटे पोलीस हवालदार विटा पोलिस स्टेशन, मोरेश्वर जोशी निरीक्षक वैधमापन शास्त्र विटा विभाग,श्री आर एम कुडचे लेखा परीक्षक वर्ग -१ शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी संतोष अशोक बाबर, सुजितकुमार पाटील आदी सहभागी होते. अचानक आलेल्या पथकाने वजन होऊन गेलेली वाहने गव्हाणी वरून परत घेऊन वजन तपासले त्यामध्ये तफावत आढळून आली नाही.
यशवंत शुगर नागेवाडी कारखान्यावर ऊस उत्पादक शेतक-यांनी विश्वास ठेवून जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहन कारखाना व्यवस्थापना तर्फ़े कार्यकारी संचालक आर डी पाटील यांनी केले.
कार्यक्षेत्रातील नोंद असलेल्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत पूर्ण होईल अशी ग्वाही दिली.
यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनिअर उमाकांत तावरे , चिफ केमिस्ट समाधान गायकवाड ,शेती अधिकारी संजय मोहिते , इलेक्ट्रीक इंजिनियर डी. डी. पवार , केनयार्ड सुपरवायजर दिनकर शिंदे आदी उपस्थित होते.