सुत दरातील हिंसक तेजी मंदीच्या खेळाने वस्त्रोद्योगास जुगाराचे स्वरुप*

 *सुत दरातील हिंसक तेजी मंदीच्या खेळाने वस्त्रोद्योगास जुगाराचे स्वरुप*

जागतीकीकरणानंतर कापसाच्या वायदेबाजारातील


समावेशामुळे कापसाचा सुरु असलेला सट्टेबाजार,कापुस व्यापारात शुन्य व्याजाच्या प्रचंड रकमा हाती असलेल्या आंतरराष्ट्रीय बलाढ्य कंपण्यांचा प्रवेश व साठेबाजी,शेजारच्या छोट्या राष्ट्रांना दिलेला मुक्त अबकारी कराची सुट व त्यातुन बड्या राष्ट्राकडुंन होणारे करचोरीचे प्रचंड मोठे गैरप्रकार,यासारख्या अनेक जटील प्रश्नांमुळे देशातील विकेंद्रीत यंत्रमाग लघुउद्योग गेल्या काही वर्षापासुन डबघाईस आला असताना गेल्या महिण्याभरात सुत बाजारात झालेली दीडपट हिंसक दरवाढ व आता त्यापाठोपाठ दररोज मोठ्या प्रमाणातील दरघसरणीमुळे या व्यवसायास अक्षरश: जुगाराचे स्वरुप आले आहे. सुत दर वाढताना कमी दराचे सुत न मिळणे ,सुत दरवाढीच्या प्रमाणात कापडदरात वाढ न होणे व आता सुत दर कोसळल्याने थांबलेला कापड व्यापार,घसरण लागलेले दर व पदरात असलेले वाढीव दराचे सुत या परस्परविरोधी प्रकारामुळे यंत्रमागधारकांना दोन्ही बाजुने प्रचंड नुकसान सोडावे लागत आहे.

दिपावलीच्या दरम्याण ३२ काऊंटच्या सुताचे दर १८० रु किलो होते तर कापसाचे दर ४१००० खंडीस स्थिर होते त्यानंतर अचानकपणे सुत दरात दररोज ५/१० रुपयाची वाढ करण्यात येऊ लागली व महिण्याभरात हे दर दीडपट वाढुन २७० रुपयापर्यंत वाढवण्यात आले या दरम्याण कापुस दर मात्र स्थिर होते तर या वाढीव दराच्या तुलनेत कापडास वाढीव दराची मागणी नव्हती तरीही दररोज सुत दर वाढतच होते.हा प्रकार या साखळीतील सर्वच घटकांच्या दृष्टीने अनाकलनीय होता.तरीही ठरवुन दर वाढवीले जात होते. यात बड्या सुत व्यापाऱ्यांनी अक्षरश: आपले उखळ पांढरे करुन घेतले तर यंत्रमागधारकाचे दिवाळे निघण्याचे वेळ आली.आता कालच्या चार दिवसांपासुन मात्र हे हिंसक पद्धतीने वाढवीलेले दर कोसळु लागले असुन दररोज ५/१० रु कमी होऊ लागल्याने बाजारपेठेत प्रचंड संभ्रम निर्माण होऊन सुत व कापड व्यापार पुर्णपणे ठप्प झाला आहे व या सर्व प्रकाराचा दुहेरी आर्थिक फटका यंत्रमागधारकांना बसु लागला आहे.कापसाचे दर स्थिर असताना व कापडास वाढीव दराची मागणी नसताना सुत दर दीडपट का वाढले ? हे जुगाराचे षड्यंत्र नियोजनबद्धपणे कसे राबवण्यात आले ? यातुन कोणकोण्या बड्या सुत व्यापाऱ्यांनी प्रचंड नफेखोरी केली या सर्व प्रकाराचा केंद्रीय तपास 

यंत्रणेने तपास करुन व्यवसायास वेठीस धरणाऱ्या या गैरप्रवृत्तीवर कारवाई केली पाहीजे असे राज्यातील सर्व यंत्रमागव्यावसायीकांचे मत आहे.


किरण तारळेकर विटा

Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न.
Image