विट्यातील यंत्रमागकामगारांना १२ टक्के बोनस,दीड कोटी रुपयांचे वितरण*
विटा शहरातील यंत्रमागकामगारांना चालु वर्षी १२टक्के बोनस देण्याचा निर्णय आज विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात झालेल्या यंत्रमागधारकांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.विटा शहर,औद्योगिक वसाहत व परीसरातील यंत्रमागकामगार, वहिफणीवाले ,जाॅबर, घडीवाले ,कांडीवाले अशा २००० कामगारांना सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे वीतरण या माध्यमातुन होत आहे.
गेल्या आठ महिण्यापासुन कोरोना महामारीने वस्त्रोद्योग कमालीचा अडचणीत सापडला असुन दोन/तीन वर्षापासुन कापसाच्या व सुताच्या दरातील अस्थिरता व साठेबाजी, संगनमताने होणारे गैरप्रकार, वीजेचे वाढलेले दर,परदेशातून करचुकवेगीरी करुन आयात होणारे कापड, नोटबंदी,जीएसटी,प्रादेशीक व सहकारी-खाजगी उद्योगांतील शासकिय भेदभाव यासारख्या कारणाने व ,राज्य व केंद्र शासनाची चुकीची धोरणे व दुर्लक्षामुळे सात्तत्याने अडचणीतुन सुरु आहे.चालु वर्षामध्ये कोरोना व लाॅकडाऊनमुळे अनेक वेळा यंत्रमाग बंद ठेवावे लागले होते तर नुकसाणीमुळे शहरातील जवळपास १५०/२०० यंत्रमाग भंगारमध्ये विकले गेले असतानाही आपल्या कामगारांना दिवाळी साजरी करता यावी या विचाराने सदर बोनस देण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला आहे.
या बैठकीस यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर, दत्ताभाऊ चोथे, बाबुराव म्हेत्रे,वैभव म्हेत्रे,शिवाजी कलढोणे,अनिल चोथे,शशीकांत तारळेकर,मिलिंद चोथे,राम तारळेकर,अशोक रोकडे,विनोद तावरे,नितीन तारळेकर यांच्यासह शहरातील यंत्रमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.