भाळवणी येथील निवृत्ती सूर्यवंशी (मामा) यांचे वृद्धापकाळाने निधन
भाळवणी -
भाळवणी(ता.खानापूर) येथील निवृत्ती राऊ सूर्यवंशी(मामा) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 92 इतके होते.भाळवणी सर्व सेवा सोसायटी चे माजी चेअरमन, भाळवणी ग्रामपंचायत सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी काम पहिले होते. भाळवणी सह संपूर्ण परिसरात ते मामा या नावाने ओळखले जात होते
विट्याचे कै.लोकनेते हणमंतराव पाटील साहेब यांच्यासोबत त्यांचे नेहमीच ऋणानुबंध राहिले होते.कै. हणमंतराव पाटील साहेब यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते. पाटील घराण्याच्या सोबतचा त्यांचा हा जिव्हाळा त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जपला. स्वतःचे कमी शिक्षण असतानासुद्धा त्यांच्या काळातल्या राजकारणात मामांचा मोठा दबदबा होता. कै. हणमंतराव पाटील साहेब यांच्या नंतर माजी आमदार सदाशिवराव पाटील व युवा नेते वैभव पाटील त्यांच्यासोबत मामांनी हातात हात घालून काम केले. मामांच्या निधनामुळे भाळवणी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पाठीमागे पत्नी,मुले,मुली, सुना, नातवंडे,परतवंडेअसा मोठा परिवार आहे. *रक्षा विसर्जन विधी मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी भाळवणी ता. खानापूर या ठिकाणी होणार आहे*