*विटा नगरपरिषदेच्या कोविड सेंटरचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार लोकार्पण - नगराध्यक्षा सौ प्रतिभा (ताई ) पाटील*
विटा शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विटा नगरपरिषदवतीने विटा शहरात 29 ऑक्सिजनचे व अन्य 21 बेड इत्यादी अत्यावश्यक सोयीसुविधांच्या माध्यमातून पन्नास बेडचे हॉस्पिटल आज लोकार्पण होत आहे.
विटा शहरासह खानापूर तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग वाढू लागला आहे अनेक रुग्णांना बेड वेळेत उपलब्ध होत नाही तसेच ऑक्सिजनचा ही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे या पार्श्वभूमीवर शहरात पूर्ण वेळ रुग्णावर उपचार होण्यासाठी नगरपरिषदेने कोव्हीड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आज या रुग्णालयाचे लोकार्पण जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते मा आमदार सदाशिवराव पाटील, युवानेते मा वैभव पाटील,जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थित दुपारी 1 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांची निवासी शाळा साळशिंगे रोड, विटा येथे होत आहे या रुग्णालयामुळे परिसरातील अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहेत.
शहरासह खानापूर तालुक्यातील कोरणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागल्यामुळे विटा शहर हे कोणाचे हॉटस्पॉट होऊ लागले आहे या पार्श्वभूमीवर विटा नगरपरिषदेने कोव्हीड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून हे रुग्णालय आज पासून सुरू होत आहे. विट्यात ग्रामीण रुग्णालय, विद्यार्थी वसतिगृह, ओमश्री, वारे हॉस्पिटल, सद्गुरु हॉस्पिटल येथे कोव्हीड रुग्णालय सुरू करण्यात आली आहेत आता विटा नगरपालिकेने 50 बेडचे कोव्हीड रुग्णालय तयार करून त्याचे लोकार्पण आज केले जात आहे या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांचा वापर करून शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी ऑक्सिजन यंत्र आणि इतर साहित्य स्वखुशीने या रुग्णालयाला प्रदान केले आहे शहरात वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व पूर्ण पॉझिटिव रुग्णांना या हॉस्पिटल मुळे दिलासा मिळणार आहे असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.