शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे विराज चा पहिला हप्ता 2400 रु प्रति टन खात्यावर जमा - सदाशिवराव पाटील*
रास्त भाव आणि करेक्ट वजन व वेळेत रक्कम देऊ असे आश्वासन शेतकऱ्यांना देऊन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विराज केन्स अँड एनर्जी लिमिटेड हा कारखाना 27 ऑगस्ट रोजी चालू केला. यावेळी शेतकर्यांना आपल्या उसाचे बिल हे पंधरा दिवसात देऊ असे आश्वासित केले होते या पार्श्वभूमीवर दिनांक 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत ज्यांनी आपला ऊस कारखान्याला दिला अशा सर्व शेतकऱ्यांच्या बिला पोटी ऍडव्हान्स रक्कम रुपये 2400 प्रतिटन याप्रमाणे विटा अर्बन बँक शाखा विटा येथे आज जमा केले. बोले तैसा चाले या म्हणीप्रमाणे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची पूर्वीपासूनच ख्याती आहे आणि हिच ओळख या माध्यमातून सिद्ध होताना दिसत आहे.
एकीकडे जर आपण पाहिलं तर कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यापार व व्यवहार ठप्प असताना देखील माझ्या शेतकऱ्याला आर्थिक अडचण होऊ नये या भूमिकेतून सदाशिवराव भाऊंनी आपला कारखाना सुरू केला आणि अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी ठेवली त्याचेच फलित म्हणून आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा केला त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर वेळोवेळी जमा केले जाईल त्यामुळे कोणताही विचार नकरता आपला ऊस हा कारखान्याला पाठवावा असे अवाहन कारखान्याचे अध्यक्ष मा आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले आहे.