पश्चिम भारतात विटा शहराचा स्वच्छतेत प्रथम क्रमांक

  • पश्चिम भारतात विटा शहराचा स्वच्छतेत प्रथम क्रमांक


विटा प्रतिनिधी - 


  


  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये विटा नगरपरिषदेने उल्लेखनीय यश संपादन करत पश्चिम भारतात ५ राज्यांमध्ये २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात पहिला क्रमांक मिळवला. स्वच्छतेतील नाविण्यपूर्ण उपक्रमाचा देशात सन्मान करण्यात आला आहे.


    आज दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप एस पुरी यांच्या हस्ते व सेक्रेटरी नगरविकास केंद्र सरकार दुर्गा शंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला विटा नगरपरिषद चे मा. नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॕड ॲम्बिसिटर वैभव पाटील, नगराध्यक्षा सौ.प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी यांनी अ़ॉनलाईन वेबद्वारे या सन्मान सोहळ्यात सहभाग घेतला.


     विटा शहराने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चमकदार व दमदार कामगीरी करत देशपातळीवर स्वच्छ शहर म्हणून सलग दोनवेळा झेंडा फडकवला आहे. यामुळे विटेकरांची छाती अभिमानाने फुलली आहे. स्टार रेटींगमध्ये थ्री स्टार नामांकन, मैलाशुध्दीकरण प्रकल्पास राज्यात आदर्श मॉडेल व ओडीएफ प्लस प्लस नामांकन असे घवघवीत यश मिळवले आहे. घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, हगणदारीमुक्त शहर, प्लास्टिकमुक्त, कचराकुंडीमुक्त, वराहमुक्त, झोपडपट्टी मुक्त शहर तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत, बायोचार, यासोबतच शहरामध्ये नित्य साफसफाई, जनजागृतीसाठी अनेक उपक्रम पालिकेने हाती घेत केलेल्या परिश्रमाचे आणि यामध्ये विटेकर नागरिकांनी घेतलेला हा उत्फूर्त सहभाग यामुळेच हे यश मिळवण्यात पालिकेला यश आले आहे.


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न.
Image