नामदार जयंत पाटील पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागाचे ठरले देवदूत - वैभव पाटील

*नामदार जयंत पाटील पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागाचे ठरले देवदूत - वैभव पाटील


 


 महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांनी जिल्ह्यावर आलेल्या महापुराच्या संकटावर अगदी शर्तीचे प्रयत्न करून मात केली आहे. कोयना वारणा व राधानगरी धरणाच्या पाण्याचे नियोजन तसेच कर्नाटक सरकार बरोबर समन्वय ठेवत अलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग या सर्व बाबींचे दूरदृष्टी ठेवून तातडीने यंत्रणा कामाला लावत त्यांनी येऊ घातलेल्या महापुराच्या संकटातून पूरग्रस्त जनतेला अगदी अलगदपणे बाहेर काढत त्यांना भयमुक्त करण्याचे काम नामदार जयंत पाटील यांनी केले आहे.


  गेल्यावर्षी महापूर आल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतः रोज हजारो लोकांना दोन वेळचे जेवण, नाष्टा, चहा, पाणी या सर्वांची राहण्याची सोय केली होती. त्यांनी स्वतः नागरिकांचे हाल पाहिले असल्याने महापुराची दाहकता काय असते हे माहीत आहे, त्यामुळे त्यांनी योग्य नियोजन करून जनतेला येणाऱ्या मोठ्या संकटातून सावरले आहे. कोरोना सारखा संसर्गजन्य रोग घोंगावत असताना देखील ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत होते. त्यांनी दूरदृष्टी ने केलेल्या नियोजनामुळे महापुरासारखे महासंकट रोखण्यामध्ये यश आले आहे. त्याचबरोबर खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ या दुष्काळी तालुक्यात टेंभू, ताकारी म्हैसाळ यासारख्या जलसिंचन योजनांना महापुराचे जादाचे पाणी देऊन सर्व तलाव भरून घेतल्याने दुष्काळी भागातील जनता सुद्धा त्यांच्यावर खूप समाधान व्यक्त करताना दिसत आहे. संकटावर मात कशी करावी त्यातूनच गरजवंतांना मदतही कशी करावी हे नामदार जयंत पाटील यांनी आज दाखवून दिले आहे.


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न.
Image