स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा देशात प्रथम क्रमांकाचे शहर ठरेल - माजी आमदार ॲड सदाशिवराव पाटील

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा देशात प्रथम क्रमांकाचे शहर ठरेल


   माजी आमदार ॲड सदाशिवराव पाटील


विटा नगरपरिषदेत आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न 


विटा प्रतिनिधी -


    केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रम स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण या महत्वकांक्षी उपक्रमांमध्ये विटा नगर परिषदेने सलग तीन वर्षे देशपातळीवर स्वच्छते मध्ये अव्वल स्थान मिळवले आहेत स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये पश्चिम भारतात पहिला क्रमांक मिळवत आपले स्थान कायम ठेवले आहे. विटा पालिकेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास देशपातळीवर पहिल्या क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे. तसेच ओडीएफ प्लस प्लस, FSTP प्लांटला राज्यात शासनाने आदर्श मॉडेल दर्जा दिलेला आहे. या मिळालेल्या यशात अधिकचे सातत्य ठेवत देशात विटा शहराला नंबर वन बणवण्याचा निर्धार विटा पालिकेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज विटा नगरपरिषदेत महत्वपूर्ण बैठक मा.आमदार ॲड सदाशिवराव पाटील व स्वच्छतेचे ब्रॕड ॲम्बीसिटर मा. नगराध्यक्ष ॲड वैभव पाटील यांच्या उपस्थिती संपन्न झाली.


  यावेळी मा.आमदार ॲड सदाशिवराव पाटील म्हणाले की, विटा शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये स्वच्छतेत देशात अग्रणी स्थान मिळवत पश्चिम भारतात पहिला क्रमांक मिळवला आहे. यामध्ये विटा शहरातील सर्व नागरिक, संस्था, असोशिएशन, स्वच्छतादुत, व नपा कर्मचारीइत्यादी सर्वांचे अनमोल योगदान आहे. या मिळवलेल्या यशात सातत्य ठेवत या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी पालिका युध्दपातळीवर प्रयत्न सुरु करत आहे. आपण सर्वांनी स्वच्छतेच्या या मोहीमेत सक्रिय योगदान देत सहभागी व्हावे. असे यावेळी प्रतिपादन केले.


यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुशंगाने कृती आराखडा तयार करण्यात आला. शहराच्या स्वच्छतेत सातत्य व नवोपक्रमास प्राधान्यक्रम देत २०२१ च्या सर्वेक्षणाची सुरुवात केली आहे.


यावेळी बोलताना विटा नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॕड ॲम्बिसिटर ॲड वैभव पाटील म्हणाले की, विटा शहराने स्वच्छतेत गत तीन वर्षे देशपातळीवर उल्लेखनीय काम करत सन्मान मिळवला आहे. यामध्ये हरएक विटेकर नागरिकाने स्वच्छता हा संस्कार म्हणून शहरात स्वच्छतेच्या मोहीमेत सातत्याने योगदान दिले आहे. यावर्षीच्या सर्वेक्षणात केलेल्या कामाची देशात दखल होवून मिळालेला सन्मान सर्व विटेकरांच्या कष्टाचा आहे. येत्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये ही विटा शहराला देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया असे मनोगत व्यक्त केले.


यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या मार्गदर्शन पुस्तिकेप्रमाणे स्पर्धेतील निकष व तयारी याबाबत उपस्थितांना माहिती देत नियोजन तयार केले. 


   या बैठकीस माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील, मा. नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॕड ॲम्बिसिटर ॲड. वैभव पाटील, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष ॲड अजित गायकवाड, अविनाश चौथे, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, शिक्षण सभापती ॲड विजय जाधव, प्रताप सुतार, भरत कांबळे, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, राजू पाटील, गजानन निकम, नितीन चंदनशिवे, योगेश भंडारे, तेजस भिसे, नदीम मुल्ला, स्वप्निल शेंडगे, सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते.


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न.
Image