*विराज केन्सच्या 2020-21गळीत हंगामाची दिमाखात सुरुवात*
आळसंद येथील विराज केस अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याचा सन 2020 -21 हा गळीत हंगाम मोळी पूजन करून सुरु करण्यात आला यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले येणाऱ्या गळीत हंगामात विराज केन्स हे युनिट पूर्ण क्षमतेने चालवणार असून या हंगामात 1.25 लक्ष मेट्रिक टन एवढे गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे यासाठी लागणारी सर्व ऊस तोड यंत्रणा सज्ज झाली आहे. तरी परिसरातील शेतकरी व सभासद यांनी आपला ऊस हा कारखान्याला देऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले त्याचबरोबर उसाला रास्त भाव व करेक्ट वजन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचेही आश्वासन दिले. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा आमदार सदाशिवराव पाटील, कार्यकारी संचालक वैभव पाटील, संचालक विशाल पाटील, उत्तम पाटणकर, राजेंद्र माने, अशोक मोरे, गोविंदराव भोसले , अमित भोसले, संग्राम देशमुख, जनरल मॅनेजर विजय कुलकर्णी, चिफ केमिस्ट, दीपक जांभळे, दीपक पाटील, चीप अकाउंटंट हैदर शिकलगार, शेती अधिकारी रमेश शिंदे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.