आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 12 व्या वर्धापनानिमित्त शिष्यवृत्ती जाहीर - अध्यक्ष वैभव पाटील*

*आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 12 व्या वर्धापनानिमित्त शिष्यवृत्ती जाहीर - अध्यक्ष वैभव पाटील*



आज आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनींना संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी लोकनेते कै हणमंतराव पाटील या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. गेली बारा वर्षे अविरतपणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वाढता आलेख पाहता महाविद्यालयांमधून परिसरातील अनेक विद्यार्थी पदवी व पदविकेचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले आहेत यातील बरेच विद्यार्थी आय टी, नॉन आय टी सेक्टरमध्ये व प्रशासकीय सेवेमध्ये आपले भविष्य अजमावत आहेत. 


 संस्थेचे विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असून सुद्धा विज्ञान व तंत्रज्ञानावर त्यांची पकड मजबूत असताना दिसत आहे. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी विद्यापीठांमध्ये चांगल्या प्रकारे गुणवत्ता प्राप्त केली आहे तसेच वेगवेगळ्या टेक्निकल स्पर्धेत सुद्धा नाविन्यपूर्ण कामगिरी करताना आदर्श चा विध्यार्थी दिसत आहे म्हणूनच संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थी हा उच्चशिक्षित बनावा या हेतूने नवीन अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे त्यामुळे गरजू आणि कल्पक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 


 शिष्यवृत्तीसाठी नियम व अटी लागू आहेत.


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न.
Image