*रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी सदाशिवराव पाटील यांची निवड*
रयत शिक्षण संस्था, सातारा यांचे काल झालेल्या बैठकीमध्ये माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची जनरल बॉडी सदस्यपदी निवड करणेत आली. कर्मवीर अण्णांनी बहुजनांसाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा शाळा, हायस्कूल, महाविद्यालय इत्यादी माध्यमातून प्रचंड मोठा शाखाविस्तार आहे. विटा येथे बळवंत महाविद्यालयाचे उभारणी मध्ये लोकनेते हणमंतराव पाटील साहेब यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी आपली स्वतःचे मालकीची चार एकर जमीन बळवंत महाविद्यालयांस दान दिली होती. त्यांच्या हयातीपर्यंत ते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात सदाशिव भाऊ पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे विटा हायस्कूल व बळवंत महाविद्यालयांस विटा नगर परिषदेचे माध्यमातून व आमदारकीचे माध्यमातून नेहमी मदत केली होती.
त्यांचे या कार्याची दखल घेऊन मा. शरदचंद्रजी पवार साहेब, मा.ना. अजितदादा पवार व मा.ना.जयंतरावजी पाटील यांनी त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.