*विटा शहरात प्रहार करणार डॉक्टरांचे बाळंतपण*
प्रहार जनशक्ती पक्ष त्याच्या आंदोलनाच्या अनोख्या स्टाईल ने प्रसिद्ध आहे. कधी सरकारी कार्यालयात साप सोडणे तर कधी पाण्याच्या टाकीवर चढून निषेध आंदोलन असो. सांगलीमध्ये तर या पक्षाने काळया पैशाचं निषेध म्हणून चक्क काळे केस कापून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले होते. उद्या प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने डॉक्टरांचे बाळंतपण आणि रक्तदान करून निषेध नोंदवण्यात येणार आहे.
गेल्या दोन दिवसापासून विटा शहरात ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभाराविरोधात प्रहारचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सरकारी दवाखान्यातील डॉक्टर प्रसूती करीता आलेल्या रुग्णाला स्वतः च्या खाजगी रुग्णालयात नेऊन पैसे उकळण्याच्या प्रकार उजेडात आणला आहे. या आंदोलनाचा निषेध म्हणून तहसील आवारात सदर डॉक्टरांचे सीजर करून चक्क बाळंतपण करणार असल्याची माहिती प्रहार संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी दिली आहे. आता हे बाळंतपण खरंच होणार का? ते खरंच सीजर होईल की नॉर्मल? का त्यांनाही बाळाच्या नाळेला तीडा पडला म्हणून सांगली सिवीलला नेलं जाईल हे पाहण्यासाठी उद्याचा दिवस उजाडन्याची वाट पाहावी लागेल.