एका दिवसात तलाव्यात 43 दशलक्ष घनफूट पाणी आले - वैभव दादा पाटील*

*एका दिवसात तलाव्यात 43 दशलक्ष घनफूट पाणी आले - वैभव दादा पाटील*



ज्याठिकाणी 65 मिलिमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी अतिवृष्टी जाहीर केली जाते मात्र 29 जून रोजी एका तासात सर्वसाधारण 115 मिलिमीटर पाऊस पडूनसुद्धा अतिवृष्टीचा फटका काही अपवाद वगळता कोठेही बसलेले दिसत नाही ज्या ठिकाणी पाणी साठले त्याठिकाणी अतिक्रमण किंवा रस्त्याचे काम चालू असल्यानेच हा प्रकार घडला होता. विटा नगरपरिषद ही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये भारतात अव्वल आहे आपल्या गावात रोजच्या रोज कचरा घरोघरी जाऊन उचलला जातो तसेच रोजच्या रोज गटारी साफ करत असल्याने गावातील सर्व गटारे स्वच्छ असलेणेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी गटारातून थेट विट्याच्या नैऋत्य बाजूला असलेल्या तलावात पोहोचले या तलावात विट्यातील सर्व पाणी जमा होते या तलावाची क्षमता 93 दशलक्ष घनफूट आहे मात्र एका तासाच्या पावसाने या तलावात एकदम पाणी आले एवढे पाणी जमा होण्यासाठी टेंभू योजनेचे 14 दिवस पाणी चालू असावे लागते इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा कोणाला याची तीव्रता जाणवली नाही याचे सर्व श्रेय विटा नगरपरिषदेला व सफाई कामगारांना जाते. एवढी मोठी विधारक परिस्थिती होऊन सुद्धा कोणालाही याचा त्रास झाला किंवा जाणवला सुद्धा नाही याचा मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन वैभव दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले यावेळी वैभव सुर्यवंशी, मानसिंग सूर्यवंशी व रोहित सूर्यवंशी उपस्थित होते


Popular posts
लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई तपासणी पथक नियुक्तीच्याही सूचना
Image
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image