*भाळवणी चे स्वातंत्र्यसैनिक धोंडीराम बयाजीराव धनवडे यांचे वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण*

*भाळवणी चे स्वातंत्र्यसैनिक धोंडीराम बयाजीराव धनवडे यांचे वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण*


श्री.धोंडीराम बयाजीराव धनवडे हे भाळवणी गावचे सुपुत्र आज वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वयाची 99 वर्षे त्यांनी पूर्ण करीत असताना आपली शरीरयष्टी सांभाळत त्यांनी कुटुंबाची धुरा अतिशय सहजतेने व सफलतेने सांभाळली आहे.


धनवडे परिवारातील सकारात्मक विचारांचे ते प्रतीक आहेत. आम्हाला जीवनाकडे आशावादी व दुर्दम्य इच्छाशक्तीने कसे पाहावे हे त्यांनी शिकवले. समाजातील ज्या त्रासदायक रूढी परंपरा आहेत त्यास त्यांचा प्रखर विरोध करतात आणि त्याची सुरवात स्वत:पासून करतात. मृत्यूनंतरचे विधी तीन ते पाच दिवसात करायची सुरवात केली.आम्ही त्याना खास देवाला गेल्याले पाहिले नाही पण दुसरे कोण जात असतील न अडवता समजावून सांगत कारण त्यांचा कर्तृत्वावर विश्वास आहे.


आमच्या परिवारासाठी आणि समाजासाठी ते एक दीपस्तंभ आहेत. सर्वजण त्यांना 'मामा' या नावाने संबोधतो तर नातवंडांचे ते "बाबा" आहेत. संपूर्ण गावात "धोंडीराम मास्तर" म्हणून ओळखले जाणारे आमचे मामा गावच्या समाजकारणात आणि राजकारणात फारसे रमले नाहीत आपण भले आणि आपले काम भले असे त्यांना वाटते.


मुळातच स्वातंत्र्यसैनिक असल्याने बंडखोर स्वभाव वृत्ती आहे परंतु कुटुंबात त्यांनी आपल्या भावनांचा उद्रेक कधीही केलेला नाही आणि करत नाहीत. आजही या वयात त्यांची स्मरणशक्ती अतिशय प्रभावशाली आणि प्रगल्भ आहे. ते स्वतः शिक्षक म्हणून 1984 साली सेवानिवृत्त झाले परंतु शिक्षणाबद्दलची त्यांची ओढ अजिबात कमी झालेली नाही. आजही एखादी नवीन गोष्ट जाणून घ्यायची त्यांची धडपड असते. वर्तमानपत्र वाचणे, टीव्हीवरील बातम्या पाहणे, मालिका पाहणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. त्यातील एखादी शंका जर असेल तर ते आवर्जून फोन करून किंवा समक्ष भेटल्यानंतर ती स्वतः त्याचे निरसन करून घेतात. या वयातही न कंटाळता ते स्वतःची कामे स्वत: करतात.


शिक्षणाबद्दलच्या त्यांच्या या आवडीमुळे आज घरात 6 इंजिनीयर नातवंडे व एक परतवंड इंजिनियर आहे. नातवंडांचे अतिशय लाडके असणारे बाबा त्यांचे शिक्षण, जेवण, राहण्याच्या सोयी, सुविधा या बाबतीत फार काटेकोर आहेत. आज शंभराव्या वर्षात पदार्पण करताना यांचा त्यांना खूप आनंद व अतिशय अभिमान वाटतोय. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचा 99 वा वाढदिवस संपन्न केला. 


त्यांची स्वातंत्र्यपूर्व काळातील पार्श्वभूमी सुद्धा अतिशय खडतर आहे. इयत्ता सातवी पास झाल्यानंतर पूर्वीचा दक्षिण सातारा जिल्हा म्हणजे आताचा सांगली जिल्ह्यामध्ये लोकल बोर्डाकडून कार्वे ता. कराड येथे शिक्षक म्हणून कार्य सुरू झाले. कार्वे येथील ज्येष्ठ सामाजिक व स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय असणारे प्रस्थ म्हणजे संभाजीराव (बाबा)थोरात यांच्या सान्निध्यात ते आले. संभाजी बाबांच्या घरी चळवळीचे वातावरण कार्यकर्त्यांच्या विचारांचा तरुण मनावर परिणाम होऊन त्यांनी एक निर्णय घेतला शिक्षकाची नोकरी सोडली गावी आले व गावातील तरुणांचे संघटन करून ब्रिटिशांविरुद्ध तरूण मने प्रज्वलित करण्याचे कार्य सुरू केले. त्यासाठी भाळवणी या गावी राष्ट्रसेवा दलाची शाखा सुरू केली. दररोज संध्याकाळी युवकांना एकत्र करून चळवळीचे स्वरूप समजावून देणे, ज्येष्ठ लोकांची भाषणे ऐकणे, क्रांतिसिंह नाना पाटील, कुंडलचे तुफान सेनेचे युवा कार्यकर्ते जी. डी. बापू लाड यांचा सहवास लाभला. त्यांची भाषणे भाळवणीतील युवकांना ऐकायला लावली. अशा तऱ्हेने गावातील युवक देशप्रेमाने प्रज्वलित करण्याचे कार्य सुरू झाले. ज्येष्ठ नेत्यांना मदत करणे, जे भूमिगत होते त्यांना पाठबळ देणे, जेवण देणे, त्यांचे निरोप दुसर्‍या पर्यंत पोहचवणे, गावातील ब्रिटिश धार्जिण्या पाटील लोकांना समजावून सांगणे, रोजची वर्तमानपत्रे वाचून दाखवणे, चळवळीला बळकटी येईल अशी सर्व छोटी-मोठी पडतील ती कामे करण्यात पुढाकार घेतला. अशा एका दिवशी राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरू असताना ब्रिटिशांनी वेढा टाकला आणि श्री धोंडीराम धनवडे यांना अटक केली. अटकेनंतर त्यांना शिक्षा झाली काही काळ येरवडा जेल तर काही काळ धारवाड जेल येथे ठेवले गेले.............................


तुम्हाला शतकपूर्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 


धनवडे परिवार, भाळवणी


Popular posts
लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई तपासणी पथक नियुक्तीच्याही सूचना
Image
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image