आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा 10वी चा निकाल सलग 19वर्षे 100टक्के असणारी कोल्हापूर विभागातील एकमेव शाळा*

*आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा 10वी चा निकाल सलग 19वर्षे 100टक्के असणारी कोल्हापूर विभागातील एकमेव शाळा*



विटा येथील लोकनेते मा हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचा 10 वी बोर्ड निकाल सलग 19व्या वर्षी 100टक्के लागला असून असे यश मिळवणारी कोल्हापूर विभागातील ही एकमेव शाळा आहे ,यायशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार सदाशिवराव (भाऊ)पाटील ,अध्यक्ष वैभव (दादा )पाटील ,कार्यकारी संचालक श्री. पी.टी.पाटील व मुख्याध्यापक श्री.सुभाष धनवडे यांनी हार्दिक अभिनंदन केले.


   विद्यालयातील 40विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 9 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत,75टक्के ते90टक्के दरम्यान 23विद्यार्थ्यांना गुण आहेत तर 70टक्के ते 75टक्के पर्यंत 8विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले आहेत ,विद्यालयातील प्रथम 3क्रमांक पुढीलप्रमाणे


 1)कु.मयुरी शंकर कदम 95.20 टक्के


2) कू.समृध्दी संतोष इनामदार 94.80टक्के


3) सूरज नंदकुमार साळुंखे 92.20टक्के 


   विद्यालयाने यापूर्वीही स्कॉलरशिप, एन.टी.एस. व एन.एन. एम.एस.परीक्षेत आपली गुणवत्ता दाखवली आहे या यशाबद्दल सर्व पालक व विद्यार्थी यांचेकडून समाधान व्यक्त होत आहे


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई तपासणी पथक नियुक्तीच्याही सूचना
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image