भाळवणी येथील कोरोना पॉझिटिव सापडलेले ठिकाण व आजूबाजूचा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित

भाळवणी येथील कोरोना पॉझिटिव सापडलेले ठिकाण व आजूबाजूचा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित


 


भाळवणी ता. खानापूर येथे मुंबईहून आलेली साठ वर्षाची महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथे दाखल करण्यात आले तर कुटुंबातील उर्वरित पाच जणांना विटा येथे कोरंटाइन करण्यात आले आहे त्यामध्ये तीन लहान मुले व दोन मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. मुंबईहून आल्यानंतर हे कुटुंब त्यांच्या घरी होम कोरंटाइन होते. पन्नास वयाच्या वरील कोरंटाइन असलेल्या व्यक्तींचे टेस्टिंग साठी नमुने घेणे चालू केले होते. त्यामध्ये या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे व्यवस्थितपणे हे कुटुंबीय कोरंटाइन असल्यामुळे व त्या लोकांचा इतर कोणाशीही संपर्क न आल्याने भाळवणी गाव सुरक्षित आहे. तरीही हा परिसर संपूर्णपणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून तो संपूर्णपणे सील करण्यात आला आहे.


भाळवणी ग्रामपंचायतीच्या वतीने या परिसराची संपूर्णपणे जंतूनाशक फवारणी करण्यात आली यावेळी या परिसराला प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके, विटा पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, उपसरपंच मानाजी पाटील, अमोल माळी, खलील मुल्‍ला, दिलीप जाधव, ग्रामसेवक अंकुश सुर्वे, भाळवणी च्या तलाठी सरिता पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अजिम मोमीन, आरोग्य सेवक प्रमोद पाटील यांनी सदर परिसराला भेट देऊन परिसरातील सर्व नागरिकांना योग्य त्या सूचना केल्या


Popular posts
लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई तपासणी पथक नियुक्तीच्याही सूचना
Image
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image