आणखी दोन कोरोना बाधित सापडल्याने भाळवणीकरांची चिंता वाढली
भाळवणी - महादेव धनवडे
भाळवणी ता खानापूर येथील मुल्लानगर मळ्यामध्ये मुंबईहून आलेले 57 वर्षाचा पुरुष व 53 वर्षाची महिला यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे भाळवणी मध्ये कालच एक रुग्ण कोरोना बाधित सापडल्याने आणि आज त्यामध्ये दोन पॉझिटिव रुग्णांची भर पडल्याने भाळवणी पुरते हादरून गेले आहे. समाधानाची बाब म्हणजे कालच्या आणि आजच्या रुग्णांचा कोणाशीही संपर्क न आल्याने तूर्तास जास्त संसर्गाचा धोका टळला असला तरी या दोन्ही भागांमध्ये कंटेंटमेन्ट झोन लागु केला असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. आज मुलानगर मळ्या मधील कोरोना पती-पत्नी रुग्णांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात तर त्यांच्या एकतीस वर्षीय मुलाला विटा येथे कोरनटाईन करण्यात आले आहे.
मुंबईहून येणारे रुग्ण पॉझिटिव्ह सापडत असल्याने भाळवणी येथील दक्षता समितीने व आरोग्य विभागाने कोरनटाईन ची प्रक्रिया एकदम कडक केली आहे. मुलानगर मळ्या मधील बाधित परिसर सील करण्यात आला असून यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके, डॉ. अनिल लोखंडे यांनी भेट देऊन परिसराची पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या. भाळवणी ग्रामपंचायतीच्या वतीने या परिसराची संपूर्णपणे जंतूनाशक फवारणी करण्यात आली यावेळी सरपंच अमोल माळी, पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, खलील मुल्ला, दिलीप जाधव, ग्रामसेवक अंकुश सुर्वे, भाळवणी च्या तलाठी सरिता पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अजिम मोमीन, आरोग्य सेवक प्रमोद पाटील, आरोग्यसेविका ठोंबरे मॅडम यांनी सदर परिसराला भेट देऊन परिसरातील सर्व नागरिकांना योग्य त्या सूचना केल्या