गरीबा घरच्या पैलवानांना राजाराम शिंदे-सरकार यांचा मदतीचा हात... 

गरीबा घरच्या पैलवानांना राजाराम शिंदे-सरकार यांचा मदतीचा हात...


    


     कोरोनामुळे संपुर्ण जग लॉकडाउन अनुभवतोय. पण काही लोकं अक्षरशः भोगतायत.अनेक घटकांचे याकाळात प्रचंड हाल सुरु आहेत हे आपण जाणून आहोत. 


 


     कुस्ती हा लाल मातीतला रांगडा खेळ. सध्याच्या परिस्थितीत हा खेळ देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलाय.निलेश वायदंडे हा तरुण मागच्या अनेक वर्षांपासून कडेगावात अनेक गरीबा घरच्या पोरांना कुस्तीचे धडे देतोय. साधारण 70-80 पोर कायम सराव करतात. यातल्या 25-30 पोरांची परिस्थिती अगदी बेताची. याच दिवसात गावोंगावच्या यात्रा-जत्रा असतात. हीच मैदान मारून याच जोरावर वर्षभर आपलं शिक्षण व शरीर सांभाळायचं. पण कोरोना मुळे सगळंच थांबलं. हातावरच पोट असणाऱ्या या पोरांच्या आयबापानीं पै -पै गोळा करून मातीचा चिखल होईपर्यंत कष्ट करणाऱ्या पोरांच्या स्वप्नासाठी लावला. पण, आता हाताला कामच नसल्याने खाण्याचेच वांदे झाले. अनेक पोरांनी खायला खुराक नाही म्हणून सराव थांबवला. 


 


   ही सगळी गोष्ट परवा सहज बोलताना मला निलेश वायदंडेनी सांगितली. ही सगळी परिस्थिती मी राजाराम शिंदे यांना सांगितल्या नंतर त्यांनी लगेच या मुलांना काही दिवस पुरेल इतका खुराक दिला. लॉकडाउनच्या अगदी सुरुवातीलाही अनेक गरजुंना सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून मदतीचा हात दिला होता.योगायोगाने आज जागतिक कुस्ती दिन आहें. याच दिवशी मातीशी नाळ घट्ट असलेल्या राजाराम शिंदे यांनी या मातीतल्या खेळावर प्रेम कस करायचं असत हे दाखवून दिल.


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न.
Image