डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या सुटकेनंतर भाळवणी मध्ये चाहत्यांचा आउट व फटाके उडवून जल्लोष.
भाळवणी-
वाळूच्या दंडप्रकरणातून तहसीलदारांना मारहाण केल्याप्रकरणी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. पैलवान चंद्रहार पाटील यांची जामिनावर सुटका होताच भाळवणी ता. खानापूर येथे चाहत्यांनी चौकाचौकात फटाके उडवून जल्लोष केला.
विट्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांना मारहाण केल्याप्रकरणी पै.चंद्रहार पाटील याच्यावर 3 मे रोजी विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पै. चंद्रहार पाटील यांच्या सुटकेसाठी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज ठेवला होता. त्यावर न्यायालयाने दोन्हीकडील युक्तिवाद ऐकून पै.चंद्रहार पाटील यांचा जामीन मंजूर करत मुक्तता करण्याचा आदेश दिला होता. परंतु त्याचा साथीदार सागर सुरवसे याचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. आज पैलवान चंद्रहार पाटील बाहेर येताच भाळवणी येथील चाहत्यांनी आउट व फटाके फोडून चौकाचौकात जल्लोष केला.
जिल्हा सत्र न्यायालयात पै.चंद्रहार पाटील यांच्या वतीने अँड. महेश शानभाग, अँड. श्रीकांत जाधव यांनी कामकाज पाहिले. या वेळी