युवकांनी केलेल्या नाकाबंदी मुळेच भाळवणीकर आजही कोरोना पासून सुरक्षित
भाळवणी-
कोरोना चा प्रादुर्भाव जाणवू लागल्यापासून भाळवणी ता. खानापूर येथील ग्रामपंचायती बरोबरच ग्रामस्थांनी तसेच आरोग्य सेवक व येथील दिपदिव्य फाऊंडेशनचे दिशांत धनवडे व त्यांच्या टीमने जी नाकाबंदी केली होती त्यामुळेच भाळवणीकर आज ही आपल्या घरात सुरक्षित आहेत. त्याच बरोबर या युवकांनी मराठी शाळा, उर्दू शाळा या ठिकाणी क्वारनटाईन केलेल्या लोकांच्या साठी सुद्धा समाजसेवेचे ऋण म्हणून आजही अखंडपणे 24 तास समाज सेवा चालू ठेवली आहे. कोरोना च्या सुरुवातीच्या काळात येथील 40 ते 50 युवकांनी गावातील संपूर्ण सीमा सील केल्या होत्या दिशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 दिवस विविध उपक्रमाअंतर्गत गावातील लोकांचे प्रबोधन करून लोकांनी गाव कोरोना पासून दूर ठेवण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले होते. यावेळी नाकाबंदी करीत असताना गावांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी करून त्याची नोंदवही ठेवण्यात आली होती. गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्याच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या सकाळी आठ ते चार, चार ते बारा व बारा ते आठ या तीन शिफ्टमध्ये युवक सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करून गावातील ग्रामस्थांचे हे युवक प्रबोधन करत होते. यामध्ये प्रामुख्याने बळवंत कॉलेजचे प्राध्यापक दिशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र निकम, अमोल धनवडे, प्रशांत धनवडे, निखिल कुंभार, विकास जाधव, दशरथ जाधव, अनिकेत शिरतोडे, अंकुश शिरतोडे, अंकुश चव्हाण, सर्वेश कुलकर्णी, सुशांत घागरे, ओंकार सूर्यवंशी, अमित धनवडे, ऋषिकेश कुंभार, प्रतिक जाधव, हर्षद निकम, अविनाश कुंभार, चंद्रकांत जाधव, मनोज सावंत, प्रशांत गायकवाड, बापू माने, सुरज खेराडे, राहुल कोळी, रोहित कुंभार, सुशांत खेराडे, प्रवीण जाधव, हर्षद सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, संदीप बोबडे, प्रसाद बोबडे, सचिन झेंडे, शाहरुख शिकलगार, वैभव ढवळे, जुबेर शिकलगार, जमीर मुल्ला, अबरार गडकरी, पापा संदे,आसिफ होबळे, सादिक मुजावर, सलमान मुल्ला, जुबेर मोमीन, यांच्यासह इतर असंख्य युवकांनी या समाजसेवेच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते व एक महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे गावात जनजागृती मोहीम राबविण्यात आल्यामुळे आज अखेरपर्यंत भाळवणी गावांमध्ये कोरोना किंवा कोरोना सदृश्य व्यक्तीपासून भाळवणी गाव आजही सुरक्षित राहिले आहे.