भिकवडी खुर्द येथील त्या मुलाच्या संपर्कातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह : कडेगाव तालुका हादरला
भिकवडी खुर्द येथील त्या मुलाच्या संपर्कातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह : कडेगाव तालुका हादरला
कडेगाव :
कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील 10 वर्षांचा मुलगा शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील तिघांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल आज रात्री पावणे आठ वाजता आला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे यांनी दिली.
दहा वर्षांचा मुलगा नातेवाईक असलेल्या व साळशिंगे ता. खानापूर येथील महिलेबरोबर अहमदाबाद येथून प्रवास करून आला होता. यात त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 14 जणांना कडेगाव येथे गृह अलगिकरण करण्यात आले. त्यापैकी तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्यात त्या मुलाचा आजोबा, चुलती व चुलत बहीण आहेत. या घटनेने कडेगाव तालुका हादरला आहे. प्रशासन सतर्क झाले आहे.