कोरोनाच्या संकटकाळात शिवप्रताप कडून भरीव मदत- विठ्ठलराव साळुंखे.
भाळवणी - सध्या संपूर्ण देश कोरोना रोगाच्या दुष्टचक्रातून जात असून अशा अडचणीच्या काळामध्ये शिवप्रताप उद्योग समूहाच्या माध्यमातून जितकी मदत करता येईल तेवढी मदत गरीब आणि गरजू लोकांच्या पर्यंत पोहोच करण्याचा मानस असल्याचे शिवप्रताप मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी केले. भाळवणी ता.खानापूर येथे शिवप्रताप उद्योग समूहाच्या वतीने 1500 सॅनिटायझर बॉटल व मुस्लिम बांधवांना रमजान च्या निमित्ताने अन्न धान्य कीटचे वाटप करणेत आले यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक मा.विठ्ठलराव साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खानापूर पंचायत समिती सदस्य मा. संजय मोहिते,काँग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष मा.राजाराम निकम, सरपंच मा. अमोल माळी, झाकिर होबळे, खालिल मुल्ला, राजेंद्र शिंदे, राजू राजे व संस्थेचे कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते ..