कोरोनाला भाळवणीकरांच्या पासून चार हात दूर ठेवणारे आरोग्य सेवक प्रमोद पाटील यांचा आज वाढदिवस
भाळवणी - कोरोना रोगाने तर संपूर्ण जगभरात थैमान घातलेच आहे परंतु या रोगापासून लोकांचा कसा बचाव करायचा यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा व पोलिस यंत्रणा कामाला लागली असताना आरोग्य सेवक प्रमोद पाटील व त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नाने आज पर्यंत तरी भाळवणी करांचा बचाव झाला आहे. कोरोना रोगाच्या सुरुवातीलाच आरोग्य सेवक म्हणून प्रमोद पाटील यांची भाळवणी साठी निवड झाली आणि येथेच भाळवणी करांनी कोरोणावरती 50 टक्के विजय मिळवला होता.
भाळवणी गावाला कुटुंब मानून आरोग्य सेवक प्रमोद पाटील यांनी या गावाला कोरोना रोगापासून चार हात दूर ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. गाव जागे व्हायच्या अगोदर पाटील साहेब गावात येतात, गावातील लोकांना माईकवरून आव्हान करतात लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देतात. अडाणी लोकांना त्यांच्या भाषेत शिकलेल्या लोकांना त्यांच्या भाषेत अगदी व्यवस्थित समजावून सांगतात. कोरोना रोगाची पार्श्वभूमी चालू झाल्यापासून प्रमोद पाटील यांनी भाळवणीकरांच्या साठी घेतलेले कष्ट व त्यांची तळमळ भाळवणीकर कदापिही विसरणार नाहीत किंबहुना आज त्यांच्यामुळेच हा रोग या गावापासून चार हात दूर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या कामाप्रती असणारी तळमळ आणि निष्ठेने आणि झोकून देऊन काम करणार्या डॉक्टर प्रमोद पाटील यांचा आज वाढदिवस.
खानापूर तालुक्यातील आळसंद गावातलं प्रमोद शंकर पाटील नावांचं एक अजातशत्रु नावांचं व्यक्तिमत्व म्हणजेच प्रमोद पाटील त्यांच्या प्रेमात अगदी कुणीही पडांवं असं असाधारण व्यक्तिमत्व यामुळे अनेक मित्र निर्मान केले
विटयापासुन १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने विचाराने प्रगल्भ व संत सदगुरु लिंगेश्वर महाराज यांच्या सहवासाने या गावला अध्यात्मिक वारसा लाभलेले आळसंद हे गाव .तोंडात साखर वाणीतल्या गोडव्याने माणसं कशी जोडावीत याचं उत्तम कौशल्य त्यांच्याकडुनच शिकावं असा स्मृतभाषी स्वभाव म्हणजेच प्रमोद पाटील आज त्याचा वाढदिवस त्यानिमित्ताने
माणसं जोडली जावीत ती स्वार्थापलीकडंची याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटील साहेब ..सामाजिक स्तरावरावर ताणतणावाच्या राहणीमानात समाधान शोधुन सापडेल अशी शंका व्यक्त केली जात असताना प्रमोद पाटील यांच्याकडे पाहिले की नेहमीच समाधान आनंदी असल्याचा भाव दिसतो. माणुस म्हटलं की संसाररुपी अर्थिक प्रश्न,समोर उभे राहतातच मित्रांसह समाजातल्या प्रत्येक भेटणाऱ्या माणसाबरोबर मैत्रीचे सबंध जोडणारा हा अवलीया हा अजातशत्रु तर आहेच जन्मदात्या आई,वडिलांच्यावर प्रचंड प्रेम करणारा प्रेमळ दयाळूही आहे.या दोन माणसांच्या छत्राने समाजात आपण बोलतो कसे वागतो कसे याचंच संस्कारीक दर्शन घडते नोकरीत काम करताना प्रमोदजीची कामाची तळमळ पहावी अशी आहे .लोकांच्यात मिसळावं त्यांच्या सुरात सुर मिसळुन आरोग्याच्या समस्या जाणुन घ्याव्यात यात पाटील साहेब आपला बराच वेळ खर्ची करत असतात त्याचं खुप समाधान त्यांनी मिळवले आहे. वाढदिवसानिमित्ताने त्यांचे आयुष्य सुखाचे समाधानाचे आरोग्यदायी भरभराठीचे जावो.हीच मनोकामना व प्रार्थना!