शिराळा तालुक्यातील आणखी दोघांना कोरोणाची लागण  -जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

शिराळा तालुक्यातील आणखी दोघांना कोरोणाची लागण 
-जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी


सांगली - निगडी तालुका शिराळा येथील ३०वर्षिय पुरुष व 24 वर्षीय महिला हे दोघे पति-पत्नी दि.14 मे रोजी मुंबईहून आले होते. तथापि या दोघांना निगडी गावातील लोकांनी गावात न घेतल्याने ते जांभूळवाडी येथील कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये राहत होते. या दोघांनाही काल लक्षणे दिसू लागल्याने त्यांचा स्वाब तपासणीसाठी घेण्यात आला होता. स्वाबचा अहवाल आज प्राप्त झाला असून दोघांची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे . या कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये अन्य तिघे रहात होते . त्यामुळे उर्वरित तिघांनाही आयसोलेशन वॉर्ड मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांनी दिली.


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न.
Image