*सर्व पक्षीय निर्णय होऊन पुढील दोन दिवस विट्यात जनता कर्फयु

*सर्व पक्षीय निर्णय होऊन पुढील दोन दिवस विट्यात जनता कर्फयु


कोरोनाच्या पार्शवभूमीवर गेली 40 दिवस देशात कडक बंद पाळण्यात आला मात्र गेल्या काही दिवसापासून आपल्या भागात बाहेर गावाहून अनेक लोक यायला लागले आहेत त्यामुळे कोरोनाचा धोका वाढेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आपण सर्वांनी घेतलेली काळजी व आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे विटा शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आपण यशस्वी झालो आहोत. मात्र काल दिनांक १०/०५/२०२० रोजी खानापूर तालुक्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला असून,  इथून पुढे आपल्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपणाला कसोशीने प्रयत्न करावयाचे आहेत. तरी सर्वांना आवाहन  करण्यात येते की, मंगळवार दिनांक १२/०५/२०२० व बुधवार  दिनांक १३/०५/२०२०  या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही सेवा उपलब्ध होणार नाही. सर्वांनी आजाराचा वाढता प्रसार लक्षात घेता, पुढचे दोन दिवस पूर्णपणे  विटा शहर  बंद करावे लागणार आहे आणि यातच आपले हीत आहे.आम्ही सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की, कोणीही घराबाहेर पडू नये.अशी विनंती सर्व सदस्यांकडून करणेत येत आहे.या बैठकीला वैभव सदाशिवराव पाटील(माजी नगराध्यक्ष), अजित अशोकराव गायकवाड (उपनगराध्यक्ष) अमोल  बाबर, किरण तारळेकर, फिरोज तांबोळी (आरोग्य सभापती), संजय तारळेकर, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, धर्मेश पाटील, अमर शितोळे आदि उपस्थित होते. 


Popular posts
लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई तपासणी पथक नियुक्तीच्याही सूचना
Image
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image