नामदार जयंतराव पाटील व पाणी फाउंडेशन ठरले दुष्काळी भागाचे जलदुत - वैभव दादा पाटील*

*नामदार जयंतराव पाटील व पाणी फाउंडेशन ठरले दुष्काळी भागाचे जलदुत - वैभव दादा पाटील*



 गेल्या वर्षी महापुराने सांगली जिल्ह्यांच्या नदीकाठावर थैमान घातले ,अनेक गावांतील दैंनदिन जनजीवन विस्कळीत झाले ,शेतकरी व नागरीकांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला या अनुभवाच्या पार्श्वभुमीवर पुराचे अतिरीक्त ठरणारे धरणातील पाणी दुष्काळी भागाला देता यावे यासाठी नामदार जयंतराव पाटील साहेबांनी शासनस्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करून येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर धरणातील पाणी टेंभु, ताकारी, म्हैसाळ या योजनांमध्ये सोडले व या माध्यमातून सर्व पाझर तलाव भरून घेतले आहेत.त्यामुळे दुष्काळी भागातील सर्वच विहिरी व बोअर ला मुबलक पाणी उपलब्ध झाले असुन ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याचे टॅंकर बंद झाले तसेच शेतीला सुद्धा मुबलक पाणी मिळत आहे.


 माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात तब्बल बाराशे कोटी चे टेंभूचे काम त्यांनी नियोजनपुर्वक व जिद्दीने पूर्ण केले .टेंभुचा पाट सांगोला तालुक्यातील बुध्दिहाळच्या तलावा पर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आणि याच कॅनॉलमध्ये नामदार जयंतराव पाटील साहेब यांनी मागील पुराचा अनुभव विचारात घेऊन धरणातील जादाचे पाणी सोडण्याच्या जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व मतदारसंघातील नागरिक त्यांचे आभारी आहोत.


  यातच गेल्या तीन वर्षापासून सर्वच गावातील लोकांनी एकत्र येऊन पाणी फाऊंडेशनचे जे काम उभा केले आहे आणि कालच्या वर्षी पाऊसही चांगला झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असल्याच्या पार्श्वभुमीवर टेंभुच्या पाण्याने सर्व तलाव भरलेमुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा निकालात निघाला आहे.पाणी फाउंडेशन व दुरदृष्टी असलेले नामदार जयंतराव पाटील साहेब हे दुष्काळी भागाचे जलदुतच ठरले आहेत.


*अॅड.वैभव सदाशिवराव पाटील*


Popular posts
लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई तपासणी पथक नियुक्तीच्याही सूचना
Image
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image