भाळवणी येथील रवी एज्युकेशन संस्थेच्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऊस तोडणी मजुरांना डेटॉल साबनाचे वाटप
भाळवणी - नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भाळवणी ता.खानापूर येथील रवी शिक्षण संस्थेच्या वतीने भाळवणी येथे असणाऱ्या ऊसतोडणी कामगार मजूर महिलांना व पुरुषांना संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी शिंदे- खेराडे व संस्थेच्या संचालकाच्या वतीने डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले.
यावेळी रवी एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी शिंदे खेराडे यांनी ऊस तोडणी कामगार मजुरांना तसेच महिलांना कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या व आरोग्याच्या बाबतीमध्ये कशाप्रकारे काळजी घ्यावी याची माहिती दिली. यवतमाळ जिल्ह्यातील जामबाजार, काकरदाती, परभणी जिल्ह्यातील बरमापुरी, तसेच धुळे, बीड या जिल्ह्यातील हे ऊसतोडणी कामगार क्रांती, सोनहिरा, उदगिरी या कारखान्यावरती ऊसतोडणी साठी आले आहेत. यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी शिंदे -खेराडे म्हणाल्या कि संस्थेच्या वतीने अनेक समाजोपयोगी कामे आजपर्यंत केली आहेत. सध्या कोरोना रोगाने थैमान घातले असून या रोगापासून स्वतःची आणि कुटूंबाची काळजी कशी घ्यावयाची याची माहिती या ऊसतोडणी कामगारांना देणे आवश्यक होते त्यादृष्टीने स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी म्हणून डेटॉल साबणाचे वाटप या लोकांना करण्यात आले.
यावेळी आनंदराव शिंदे, रेश्मा शेख, विश्वास खेराडे, आनंद खेराडे, वैभव खेराडे, प्रवीण चव्हाण, लता खेराडे - देवकर, अर्जुन चव्हाण, बाळासो सूर्यवंशी, रविंद्र कनाळकर, योगिता पोळ, अश्विनी शिंदे -खेराडे, प्रवीण चव्हाण, अर्जुन चव्हाण, विद्या घाडगे, जयश्री शिंदे, अवधूत रणखांबे, गौरी फासे, मयुरी गवळी यांच्यासह सर्व सदश्य उपस्थित होते.
भाळवणी येथील रवी एज्युकेशन संस्थेच्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऊस तोडणी मजुरांना डेटॉल साबनाचे वाटप