भाळवणी येथील संजीवनी नागरी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री फ़ंडास 51 हजारांचा निधी
भाळवणी - भाळवणी ता. खानापूर येथिल संजीवनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी साठी 51 हजाराच्या निधी चा चेक खानापूर तालुका सहाय्यक निबंधक शेख साहेब यांच्याकडे देण्यात आला. आपत्कालीन स्थिती मध्ये मदत करण्यासाठी भाळवणी येथील संजीवनी नागरी सहकारी पतसंस्थेचा नेहमीच हातभार असतो. यापूर्वी देखील महापूर असो वा दुष्काळ या आपत्ती च्या वेळेस संजीवनी पतसंस्था मदत करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
यावेळी चेअरमन रणजीत पाटील, जेष्ठ संचालक नामदेव चव्हाण, पांडुरंग शिंदे (गुरुजी), लक्ष्मण चव्हाण व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
भाळवणी येथील संजीवनी नागरी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री फ़ंडास 51 हजारांचा निधी