भाळवणी चे पोल्ट्री किंग लतीफ शेठ यांचे स्मरणार्थ फय्याज शेठ मुल्ला यांचेकडून गोरगरिबांसाठी 24 हजार अंडी.
भाळवणी - गोरगरीब व अडचणी च्या काळामध्ये भाळवणी ता. खानापूर येथील दिवंगत लतीफ शेठ मुल्ला नेहमीच धावून जात असत आज त्यांचे सुपुत्र फय्याज शेठ मुल्ला यांनी देखील तितकाच दिलदारपणा दाखवला. कोरोनाच्या पार्शवभूमीवर गोगरिबांना अन्नधान्य व गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी विट्यातील आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप ने मोठे योगदान दिले आहे. वाड्या वस्त्यांवर जाऊन आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप च्या युवकांनी गोरगरिबा पर्यंत सर्व ती मदत पोहोच केली आहे.आम्ही विटेकर कल्चरल गृपच्या आवाहनास प्रतिसाद देत भाळवणी येथील फय्याज शेठ मुल्ला यांनी देखील गोरगरीब लोकांना देण्यासाठी 24000 अंडी आम्ही विटेकर कल्चरल गृपकडे सुपूर्द केली.फय्याज शेठ यांच्या या दिलदारपणाचे भाळवणी परिसरातून कौतुक होत आहे.यावेळी आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे विकास जाधव, माधव रोकडे, पांडुरंग पवार, मैनुद्दीन पठाण यांच्यासह या ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते
भाळवणी चे पोल्ट्री किंग लतीफ शेठ यांचे स्मरणार्थ फय्याज शेठ मुल्ला यांचेकडून गोरगरिबांसाठी 24 हजार अंडी.