अनादि काळापासून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कोणास ठाऊक पूर्वग्रहदूषितच राहिला आहे .अगदी या दृष्टिकोनाचा फटका थोर पती व्रतेची उपासक माता अनुसयेलाही बसला आहे. मातेच्या पतिव्रता धर्मालाच संपवायच हेठरूऊन गेलेले त्रिदेव मात्र मातेच्या पतिव्रता धर्मातच एवढी ताकद होती की त्रिदेवांची मुळासकट दृष्टी बदलली आणि दत्तात्रेय अवतार धारण करविला, हे फक्त अध्यात्म आपण वाचतो, बघतो व दत्तजयंती पर्यंतच्या दिवसांपर्यंत सुंठवडा खाण्या इतपत मर्यादितेच रहाते .यापलीकडे स्त्रीचं शील जपणारी माता "अनुसया" निर्माण होईल का ?असा केवळ आशावाद या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो.द्रोपदीचही तेच झाले सीतामातेच ही तेच झाले.आज कीर्तनातून आपण ऐकतो की रावणाने सीतेचे अपहरण केले पण आज रावणाचा सुद्धा विक्रम सध्या मोडतानाचे चित्र आहे,सध्याच्या युगामध्ये स्त्री ही फक्त उपभोग्य वस्तू झाली आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही .या आजच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महिलांची शक्ती एकवटताना दिसत आहे या एकवटणार्या शक्तीला पाठबळ देण्यासाठी आपण आपापल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत इतकंच. आपण आपली दृष्टी अंतर्मुख करत नाही तो पर्यंत हे कोडं उलगडलं तसं कठीणच आहे. कारण दुसऱ्याच्या घरी चोरी ,मारामारी ,अत्याचार ,विनयभंग इत्यादी गोष्टी घडल्याचे ऐकतो पाहतो पण जरा तोच प्रसंग आपल्यावर येऊन ठेपला तर? पायाखालची जमीन आणि डोक्यावर असमान सररररकण सरत कारण "राजे शिवाजी "जन्माला यावेत ते आपल्या घरात नाही दुसऱ्याच्या आणि शिवाजी राजेंची भूमिका ही पेहराव संबंधातील वेशभूषेपर्यंत ठीक आहे ,परंतु पेहराव्यातील शिवाजींकडेअनेक नजरा भिरभिरतात त्या वेशभूषेला लाईकही मिळतात परंतू पेहराव्यातील शिवाजीला मात्र माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा लोकांचा शिवाजी म्हणून आहे हे ते हा लोकांचा शिवाजी म्हणून आहे हे ते दुसऱ्या दिवशी जाणीव पूर्वक विसरतात,मित्र मैत्रिणीं च्या गराड्यामध्ये त्यांची सिगारेट ओढतानाचे आणि बाइकवरची मोठमोठ्याने आवाज करत स्टायलिश रायडिंग खूप काही सांगून जाते ,असो पूर्वी स्त्री स्त्रीत्वाच्या शीलाचे जागा ही लग्नामध्ये रूपांतर व्हायची, आज तीच जागा आजच्या युगात मात्र बदल होत होत "लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये"येऊन ठेपल्याचे दिसते.आओ जाओ घर तुम्हारा, अशीच एकंदरीत मुक्त भोगव्यवस्थेकडे नाते विरहित होत असलेल्या बदलाला जबाबदार दुसरे तिसरे कोणीही नाही तर आपण स्वीकारत असलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या उदात्तीकरणाचे हे परिणाम आहेत , स्त्रीची अवस्था ही एखाद्यानिराधार वेली समान होऊन राहिली आहे.वेलीला फूले सुंदर आणि सुगंधही सुंदर येताे ,अशातच या वेलीला झाडाचा(आई ,भाऊ,वडील,नंतर पर्यायाने पती) आधार निश्चित हवाच. परंतु नंतर या नात्यांची जागा बदलत्या काळानुरूप 'प्रेम 'या अडीच अक्षरी गोंडस शब्दाने घेतली.पूर्वी प्रेम या शब्दाचाउच्चार म्हटला की वेगळा आभास वाईचा यामध्ये अनेक दिग्दर्शकांनी आपापल्या परीने समाजात प्रबोधन ककरण्याचे काम केले परंतु दुर्दैवाने नेमके उलटेच समाजाने घेतलेआणि त्याचा परिणाम मग "एक दुजे के लिये पासून सुरुवात होऊन आशिकी "दोन पर्यंतचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे, हे कमी होतं म्हणून का काय त्यात" सैराट" नेही जाम भर घातली आणि सर्व ' प्रेम' या शब्दाची व्याख्याच जणू बदलून गेली .प्रेम या शब्दात कधी नात्यांचा विचारच माणसे करत नाहीत का ?असा प्रश्न कधी कधी पडल्यावाचून राहत नाही,आई -बाबा ,वडील -मुलगा ,आई -मुलगा, मुलगी, नात -नातू ,सून ,पती -पत्नी ,सासू, भावजय ,दीर -भाऊजी ,अशी अनेक कौटुंबिक नाती ही या 'प्रेम 'व्याख्यांमध्ये नक्कीच बसतात ,पंरंतू या व्यतिरिक्त जे 'उतू जाते ते प्रेम 'का? प्रेम या शब्दाची व्याख्या वाचताना कुणी लिहिले होते माहिती नाही ते असे म्हणतात *एक मन एका मनावरती प्रेम करते त्यावेळी ती इच्छा असते *एक देह एका देहावर ती प्रेम करतो त्यावेळी ती वासना असते* एक आत्माराम एका आत्मा रामावरती प्रेम करतो त्यावेळी ते "निखळ प्रेम "असते,मग तो मनुष्य असो वा प्राणी स्त्री असो वा पुरुष पंचतत्व असो वा सृष्टीतील कोणताही घटक मात्र आपण या कोणत्या प्रेमाच्या व्याख्येत बसतो हे अंतर्मुख होऊन बघायला हवे अन्यथा पुढचे दिवस कसे येतील याचा विचार न केलेलाच बरा .यासाठी आपल्या नात्यांमध्ये संवाद हवाच कारण पूर्वापार चालत आलेली "वसुधैव कुटुंबकम" हीच संस्कृती तारेल आणि याचा मूळ पाया ही "उत्तम आचारशील स्त्रीच आहे " हे कदापि विसरून चालणार नाही यासाठी स्त्रीनेही तेवढ्याच जबाबदारीने राहील हवे ,अन्यथा अाजच्या माॅडर्न संस्कृतीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जी आजची परिस्थिती दिसते ना ती फारच भयावह आहे.कारण हे मायाजाल अस आहे की ज्यात एकदा जर फसला तर रेशमी किडा रेशीम दुसऱ्यासाठी देतो स्वतः मात्रत् यांनीच विणलेल्या रेशीमी जाळ्यांमध्ये अडकून स्वतःला संपवून बसतो . खरंच स्त्रियांना आज समाजामध्ये खूप उच्च स्थान आहे ही अभिमानाची गोष्ट आहे .कोणत्याही क्षेत्रात तिची मान कायम गुणवत्तेने तसेच यशाने उंचावताना पाहायला मिळते. या मध्येतीची प्रगती हि वाखाणण्याजोगीच आहे.परंतु आज तिच्याकडे बघण्याचा, बोलण्याचा वागण्याचा, दंभमय हव्यास हा खूप खालच्या पातळीचा आणि खजील करणारा ठरतोय, याचे परिणाम वाईट आहेत तसेच काही विरोध करणाऱ्या सक्षम स्त्रिया तोंडावर सडेतोड छाप उमटवून देणाऱ्याही पाहायला मिळताहेत ,त्यावेळी तिने दिलेला विरोधात्मक आवाज हाअनेक दिवसांच्या हजारो स्त्रियांच्या अन्यायाशील सहूष्ण सहनशीलतेच्या उद्रेकाचा जणू स्फोटच असतो.कधी कधी असे स्फोट व्हायलाच हवे असे मनापासून वाटते .कारण सगळ्याच काही "झाशीच्या राणी "होऊ शकत नाहीत कारण चौका -चौकात असे मोकाट जनावरे हि वाट बघत बसलेले असतात कि मला कसे लचके तोडता येतील मी कसा हल्ला करून शिकार करेन .परंतु विशेषता ज्या तरुण वयात ज्या आमच्या ताईंचे कुंकू काही अघटित कारणामुळे पुसलं गेलं असेल त्यांच्याकडे अशा नजरा कायम भिरभिरताना डोकावताना पाहायला मिळतात . काही वेळा या एक नव्हे अशा अनेक ताईंना या प्रकारांमध्ये सर्वच क्षेत्रात काही ठिकाणी नोकरी ,व्यवसाय यांच्या दबावाच्या ओझ्याखाली कधी तिच्या आर्थिक असहाय्यतेचा गैर फायदा घेऊन तर कधी दबावाचा वापर करून लचके ही तोडले जातात अशा वेळी ती निमूटपणे सहनही करते .पण एक दिवस शंभर भरतात आणि मग नको त्या अनैतिक गोष्टींमधून खून ,अत्याचार ,आत्महत्या, त्रिकोण अशी वेगवेगळी नावे समाजात पुढे येतात. मग एवढ्या सगळ्या गोष्टी एका स्त्रि या शब्दाभोवती फिरतात तर आपण नेमके यासाठी तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिची समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी तिच्या आयुष्याची "आदर्श कहाणी" होण्यासाठी बळ द्यायच की तिची का हानी होते हे फक्त हताशपणे बघत राहायचे याचा निर्णय एकदाचा घ्यावाच लागेल .अन्यथा रोज एक प्रसंग आवासून समोर उभाच असेल आपण त्या गोष्टींवर फक्त दुःख व्यक्त करू पण त्यामुळे हानी थांबणार नाही या उलट आणखीनच अनैतिक गोष्टींना खतपाणी मिळेल उत्तरोत्तर यासाठी जनजागृतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायलाच हवेत इतकच.
"महिला दिन विशेष" स्त्री जन्मा ,तुझी ही का- हाणी!
• संपादक : महादेव धनवडे