सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव चा सागर जाधव देतोय दुबईतील भारतीयांना हवी ती मदत. Sj live च्या माध्यमातून दुबईत समाजसेवा
दुबईकरांना सागर जाधव आणि त्यांची टीम कोरोना वायरस मुळे दुबईत अडकलेल्या मराठी बांधवाना मोठी मदत करतेय त्यांनी 19मार्च ला या मोहिमेची सुरवात केली आता पर्यंत 11 लोकांना मदतीचा हात देण्यात SJ Live Dubai टीम यशस्वी ठरली आहे
आपल्या कुटुंबातील लोकांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मायभूमी पासून दूर राहणारे ज्यांचं हातावरच पोट आहे त्यांना इथं कोरोना मुळे अनेक अडचणी ना सामोरे जावे लागत आहे कंपन्या 15 ते 20 दिवसासाठी पूर्ण पणे बंद असल्याने त्याचे पगार लांब निवरती पडले आहेत खाण्या पिण्याचे तसेच राहण्याचे अत्यंत हाल होतायत
सागर जाधव आणि त्यांची टीम फेसबुक वरती एक पेज चालवते ज्याचं नाव SJ Live dubai याच सोशल मीडिया माध्यमातून त्यांनी या मदतीची ग्वाही लोकांपर्यंत पोहचवली
बगता बगता त्यांनी 10 पुरुष आणि 1 स्त्री अश्या 11 लोकांना मदत पोहचवली आणि भरपूर लोकांची चौकशी करत आहेत
या सर्व मोहिमेत मनोज बागल,योगीराज काकड,अमोल खांबात,अभिजीत गुरव या लोकांचा मोलाचा वाटा आहे
तसेच इथे राहणारे हॉटेल व्यावसायिक शाम घोलप यांनी 15 दिवसाचे जेवण फ्री दिले