भाळवणीच्या ऊरूसावर कोरोनाचे सावट
यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द ,धार्मिक कार्यक्रम साधेपणाने करणार
हिंदू- मुस्लिम ऐक्याची शेकडो वर्षी ची ऐतिहासिक परपंरा असलेल्या भाळवणीच्या सय्यद राजेवली आणि सय्यद बादशहावली यांच्या ऐतिहासिक ऊरूसावर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी चा उपाय म्हणून सर्व सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र दर्ग्यामध्ये गलफ साधेपणाने चढविण्यात येणार आहे अशी माहिती संयोजकानी दिली. यात्रेविषयी नियोजन करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. त्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.
भाळवणी च्या ऊरूसास शेकडो वर्षाची पंरपरा असून गावातील सर्व ग्रामस्थ एकोप्याने ऊरुस मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावेळी ऊरूस 30 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान होणार होता. परंतु यावर्षी प्रथमच उरूस साधेपणाने करण्यात येणार आहे. भाळवणी ऊरूसातील शोभेच्या दारुकामाची कला आतषबाजी पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. परंतु कोरोनाच्या सावटामुळे प्रेक्षक आतषबाजीस यावर्षी मुकणार आहेत. त्याचबरोबर ऊरूसात छोटे, मोठे व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. त्यावरही परीणाम होणार आहे .
भाळवणी तील लोक व्यवसाय निमित्त देशात विखुरलेले आहेत तर काही आखाती देशात आहेत . ते सर्व ऊरूसानिम्मत हमखास दरवर्षी येतात. यात मुंबई आणि पुणे येथील भावीकांची संख्या जास्त असते. ऊरूसात तसेच दर्ग्याजवळ प्रंचड गर्दी असते. जिल्हा आधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दोन दिवसापुर्वी कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व यात्रा सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना दिल्या होत्या . त्या आवाहनानुसार ऊरूस साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती संयोजकानी दिली.
भाळवणीच्या ऊरूसावर कोरोनाचे सावट यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द ,धार्मिक कार्यक्रम साधेपणाने करणार