*ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळा शिंदे चव्हाण मळा (भाळवणी) शाळेचा जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर व आदर्श शाळा पुरस्काराने गौरव*
जिल्हा परिषद सांगली मार्फत सन 2019 -20 साठी नुकत्याच जाहीर झालेल्या *स्वच्छ सुंदर व आदर्श शाळा* पुरस्काराने भाळवणी तील *शिंदे चव्हाण मळा* सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्राजक्ता कोरे शिक्षण समिती सभापती सौ आशा पाटील जिल्हा परिषद सदस्य सुलभाताई आदाटे श्री शरद लाड त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी सौ सुनंदा वाखारे उपशिक्षणाधिकारी श्री महेश धोत्रे व सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते या शाळेला सन्मानित करण्यात आले.
शिंदे चव्हाण मळा भाळवणी शाळेने नुकतेच आयएसओ मानांकन IES/ISO9001:2015 प्राप्त केले आहे.
शिंदे चव्हाण मळा भाळवणी ही एक उपक्रमशील, आदर्श शाळा आहे थोड्याच वेळात या शाळेने भाळवणी ग्रामपंचायतीचा चौदावा वित्त आयोग व शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालक व ग्रामस्थांच्या सहकार्याने खूप मोठा असा लोकसहभाग, शैक्षणिक उठाव करून शाळेचे अंतरंग व बाह्यांग ब बदलून टाकले आहे. शाळा सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज असून शाळेमध्ये डिजिटल क्लास रूम आहेत शाळेमध्ये अध्यापणा व्यतिरिक्त इतर दोन वर्गखोल्या उपलब्ध असून त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, इतिहास कक्ष व विज्ञान कक्ष ची निर्मिती करण्यात आली आहे . शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन तयार करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी स्वतःच्या सहकार्यातून शाळेसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. याठिकाणी विविध मैदानी खेळांचा सराव घेतला जातो.
शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प ,मुक्तांगण वाचनालय, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
शाळेने सर्वप्रकारच्या बौद्धिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय असे यश संपादन केले आहे .जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या कथाकथन, वकृत्व ,लोकनृत्य व इंग्लिश लैंग्वेज कॉम्पिटिशन मध्ये शाळेने सर्व प्रकारांमध्ये तालुकास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे .त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धेत ही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरापर्यंत मजल मारली आहे.
पतंगराव कदम गुणवत्ता शोध परीक्षेमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून एक विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आली आहे.
शाळांच्या वर्ग तुकड्या आणि पट एकीकडे कमी होत असताना या शाळेमध्ये मात्र यावर्षी इयत्ता पाचवी चा वर्ग सुरू करण्यात आला असून गतवर्षीपेक्षा यावर्षी पट वाढला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून या शाळेकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत.
शाळेमध्ये कार्यरत असणारे मुख्याध्यापिका सौ. नूरजहाँ राजूदिन मुल्ला व विनोद राजू आंबी हे दोन्ही शिक्षक खूप उपक्रमशील व कामसू असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत धडपडत असतात.
भाळवणी ग्रामपंचायत, सरपंच ,उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि समाजाच्या सहकार्याने शाळेमध्ये विविध सुविधा यांनी उपलब्ध करून घेतल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबासो शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे सरपंच सौ विमल ताई माळी, ग्रामसेवक अंकुश सुर्वे, सचिन चव्हाण, दिलीप जाधव, विजय चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
याकामी त्यांना तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे मॅडम विस्ताराधिकारी दत्तात्रय मोरे, केंद्रप्रमुख अनिता यलमार , यांचे प्रमाणे पंचायत समिती विटा सर्व शिक्षा अभियान सर्व स्टाफ चे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळा शिंदे चव्हाण मळा (भाळवणी) शाळेचा जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर व आदर्श शाळा पुरस्काराने गौरव*
• संपादक : महादेव धनवडे