विटा पोलिसांच्या हंटर च्या धसक्याने भाळवणीकर घरात.
अंकुश लुगडे आणि सुहास स्वामी या पोलिसांनी दिला हुल्लडबाजांना चोप.
भाळवणी - कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू केले असतानासुद्धा भाळवणी गावातील चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. ग्रामपंचायतीच्या वतीने सांगूनसुद्धा अनेक जण ऐकून सोडून देत होते. याबाबत भाळवणी ग्रामपंचायतीच्या वतीने विटा पोलिसांना निवेदन देण्यात आले होते व पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज विटा पोलीस स्टेशनचे अंकुश लुगडे व सुहास स्वामी यांनी चौकाचौकात थांबलेल्या टवाळखोर आणि हुल्लडबाजी करणार्यांना चांगलाच चोप दिला. चौकाचौकातून होणारी गर्दी कमी झाल्याने भाळवणीकरातून समाधानाचे वातावरण आहे
विटा पोलिसांच्या हंटर च्या धसक्याने भाळवणीकर घरात. अंकुश लुगडे आणि सुहास स्वामी या पोलिसांनी दिला हुल्लडबाजांना चोप.
• संपादक : महादेव धनवडे